कागल येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले; भररस्त्यात दुचाकीवरून येऊन केली चोरी

कागल: कागल येथील शासकीय नर्सरी कमानीच्या समोर हायवेवर, पुणे-बेंगलोर रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दिनांक २१/०९/२०२५) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला इंद्रजित संपकाळ (रा. गहिनीनाथनगर , कागल) या त्यांच्या मैत्रीण संध्या शहा यांच्यासोबत दुचाकीवरून घरी जात होत्या. त्या शासकीय नर्सरी कमानीच्या समोर हायवे वरून जात असताना त्यांच्या पाठीमागून एका काळ्या रंगाच्या ‘स्प्लेंडर’ मोटरसायकलवर दोन अज्ञात इसम आले.

Advertisements

त्यांनी अचानक संपकाळ यांच्या गाडीला जवळून येऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे १,५०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. हा प्रकार घडताच संपकाळ यांनी आरडाओरड केली, मात्र चोरट्यांनी वेग वाढवून पळ काढला.

Advertisements

संपकाळ यांनी तात्काळ कागल पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०१३ च्या कलम ३०९(४) आणि ३०९(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोरे तपास करत असून, पुढील तपास पोलीस हवालदार पोरे साहेब करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!