
मुरगूड ( शशी दरेकर ) -समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले.ते पद्मश्री डॉक्टर ग.गो.जाधव महाविद्यालय गगनबावडा येथे आयोजित केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, ‘शिक्षण हेच समाज उद्धाराचे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षण हा मानवी अधिकार असून सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. असा महात्मा फुलेंचा आग्रह होता.’ यावेळी राधानगरी महाविद्यालयाचे प्रा. ए.एम. कांबळे व म.ह.शिंदे महाविद्यालय तिसंगी चे प्रा.एस. एल.पवार यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अरुण गावकर तर आभार प्रा.डॉ.संदीप पाणारी यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी संस्था चेअरमन प्रा.सतीश देसाई व सचिव डॉ.विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले .प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.संतोष भोसले, प्रा. राहुल कांबळे, प्रा.सौरभ देसाई, प्रा.हुसेन फरास,प्रा. असीमा जमादार ,प्रा.सुप्रिया घाटगे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
I like this blog so much, saved to bookmarks.