मुरगूड ( शशी दरेकर ) – सामजिक प्रबोधनाच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव शांततेने साजरा करून एक नवा आदर्श निर्माण करुया, त्यासाठी डॉल्बीला फाटा देवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूका काढूया असे प्रतिपादन मुरगूडचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी केले. ते मुरगूड येथील गणेश मंडळांच्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करतांना बोलत होते.
नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस मुरगूड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व पत्रकार आदी उपस्थित होते.
यावेळी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा, मिरवणूकीमध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा, मुरगूड शहरातील सर्व मंडळे यांनी वेळेचे बंधन पाळून सन उत्सव साजरा करावा, प्रत्येक मंडळानी नगरपरिषद कार्यालय व पोलीस ठाणेची रितसर परवानगी घ्यावी, वर्गणी गोळा करीत असताना कोणावरही जबरदस्ती करू नये, गणपती मंडप मुळे रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होणार नाही याची मंडळानी दक्षता घ्यावी,
मूर्ती प्रतिष्ठापना ठिकाणी २४ तास दिवसा व रात्रौ स्वयंमसेवक नेमावेत, गणेश मूर्ती विनाकारण अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन करणार नाहीत सर्व गणेश मंडळानी गणेश मूर्ती विसर्जन अनंत चतुर्थी दिवशीच करावे, मिरवणूकी वेळी लेझर लाईट किंवा शरीराला अपायकारक विद्युत उपकरणाचा वापर करू नये, विद्युत रोषणाई बाबत एम. एस. ई. बी. कडून योग्य ती रीतसर परवानगी घ्यावी, विसर्जन वेळी कोणीही मंडळातील अध्यक्ष – सदस्य चुकीचे वर्तन करणार नाही किंवा अश्लील गाणी लावणार नाही याची दक्षता घ्यावी, याच बरोबर जातीय सलोखा राखणे बाबत आव्हान केले.तसेच सोशल मीडिया माध्यमातून वादग्रस्त पोस्ट, स्टेटस प्रसारित करू नये असे कोणी करत असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास संपर्क साधने बाबतही सर्वांना आवाहन केले.
सदर बैठकीस माजी नगरसेवक नामदेव भांदिगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रणजीत मगदूम,संदीप भारमल ,पांडूरंग पुजारी, सिद्धेश पोतदार, धीरज सावर्डेकर, पृथ्वीराज कदम यांच्यासह मुरगूड मधील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओंकार पोतदार यांनी प्रास्ताविक केले तर आभार राजू चव्हाण यांनी मानले.
Very interesting topic, thank you for posting.?