
मुरगूड (शशी दरेकर) : अवचितवाडी येथील अमोल परेकर हे आपल्या कुटुंबांसह बोळावी – बोळावीवाडी रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांच्या मातोश्री गीता परेकर यांना बिबट्याचे दर्शन झाले . यानंतर त्यांनी आपल्या मुलाला गाडी मागे घेण्यास सांगितले मात्र बिबट्या अंधारामध्ये निघून गेला होता. याची माहिती त्यांनी आपले बोळावीवाडी येथील पाहुण्याला कळल्यानंतर त्यांनी देखील त्या ठिकाणी येऊन पाहणी केली. यानंतर वन विभागाला याबाबतची माहिती कळवण्यात आली .त्यानुसार सकाळी वन विभागाने या परिसराची पाहणी केली असता तेव्हा काही आढळून आले नाही.
मात्र या ठिकाणी बिबट्या असण्याची शक्यता यावेळी त्यांनीं बोलून दाखवली, गेल्या आठवड्यात ठाणेवाडी – अवचितवाडी दरम्यानच्या घाटामध्ये टेम्पो चालक प्रथमेश सांडूगडे यांना बिबट्या दिसून आला त्यांनी तातडीने या बिबट्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते.
त्याच रात्री त्याने बोळावी येथील प्रल्हाद मोरे यांच्या कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले होते .यानंतर वन विभाग आणि वन्यजीव रेस्क्यू टीम मार्फत इन्फ्रारेड ड्रोन द्वारे परिसराची पाहणी केली होती . मात्र बिबट्या दिसून आला नाही यानंतर काही ग्रामस्थांना बिबट्याची चाहूल लागल्यामुळे त्यांनी वन विभागास कळवले होते .त्यानुसार वनविभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले मात्र गवे आणि इतर वन्य प्राणी आढळून आले . दरम्यान रात्री बोळावीवाडी रोडवर बिबट्या दिसून आल्याची माहिती मिळाल्यामुळे त्या ठिकाणी देखील वन्यजीव रेस्क्यू टीमने पाहणी केली मात्र तेथे काही आढळून आले नाही .
मात्र बिबट्या असण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. वन परिमंडळ कापशी वनपाल श्री. आप्पासाहेब बुरटे व वनरक्षक हसुर खुर्द आर के जोनवाल वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार, आशुतोष सूर्यवंशी, अमोल चव्हाण, अलमतीन बांगी, विनायक माळी यांच्या सह बोळावीवाडी चे सरपंच प्रियंका आनंदा माने आणि ग्राम पंचायत सदस्य ईश्वर पवार, दादासो कोगे, अवचितवाडी सरपंच वेदिका संभाजी गायकवाड , बोळावी सरपंच सागर माने यांनी बिबट्या दिसलेल्या ठिकाणी येऊन पाहणी केली .
I liked up to you will obtain performed proper here. The caricature is attractive, your authored subject matter stylish. nonetheless, you command get bought an impatience over that you wish be handing over the following. sick definitely come more in the past once more since precisely the similar just about very incessantly inside of case you shield this increase.
Thanks for another informative site. Where else could I get that type of info written in such an ideal way? I’ve a project that I’m just now working on, and I have been on the look out for such info.
Hmm it appears like your site ate my first comment (it was super long) so I guess I’ll just sum it up what I wrote and say, I’m thoroughly enjoying your blog. I as well am an aspiring blog writer but I’m still new to everything. Do you have any tips for novice blog writers? I’d genuinely appreciate it.
I really appreciate this post. I have been looking everywhere for this! Thank goodness I found it on Bing. You’ve made my day! Thx again
Rattling excellent information can be found on web site.