एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज

कागल : एमआयडीसीसाठी पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनंत रोटो येथील शाळेजवळ लिखेज झाली आहे.गेले कित्येक महिने हे लिकेज न काढल्यामुळे या पाईपलाईन मधील पाणी पूर्णपणे रस्त्यावरती येत आहे. या पाण्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये दोन दुचाकी धारक घसरून पडल्यामुळे अपघात झाले आहेत. अनेक वेळा याबाबत एमआयडीसी पाईपलाईन पुरवठा विभागाला कळविले असताना देखील कोणत्याही अधिकाऱ्याने याकडे लक्ष दिलेले नाही.अधिकाऱ्यांच्या अडमुट्या धोरणामुळे अनेक वाहन चालकांना या पाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Advertisements

या पाण्यामुळे चार दिवसांपूर्वीच पिंपळगाव येथील एका युवकाचा घसरून अपघात झाला असताना देखील याबाबी निदर्शनास येऊन देखील याकडे कोणी लक्ष देनारे नाहीत.वरिष्ठ पातळीवर याची कल्पना देऊन देखील याकडे लक्ष दिले जात नाही. सदर गळती बाबत अनेकांनी पत्रव्यवहार देखील केलेला आहे .

Advertisements

अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील याबाबत एमआयडीसी च्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असताना फक्त उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात येत आहेत .याकडे कोणी लक्ष देणारे आहे की नाही की एखाद्याचा जीव गेल्यानंतरच हे रस्त्यावर येणारे पाणी बंद केले जाणार आहे असा संताप सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!