कागल: कागल गावचे सुपुत्र क्रीडाप्रेमी अश्विनकुमार रामचंद्र नाईक यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांचा सन-2022-23 या वर्षीचा राज्यस्तरीय क्रीडारत्न व सामाजिक कार्य पुरस्कार जाहिर झाला आहे.
क्रीडाप्रेमी अश्विनकुमार नाईक यांना लहानपणापासून खेळाची आवड आहे.त्यांनी हे क्रीडाप्रेम जोपासत शाळा व कॉलेज जीवनात उत्तुंग भरारी मारली आहे.ते स्वतः राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू असल्याने आता पर्यंत त्यांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळणारे अनेक विद्यार्थी घडवले आहेत
तसेच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही सत्याच्या मार्गाने यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्यांनी अनेकांना सढळ हाताने मदतही केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘शाहू महोत्सव 2022 ‘ या कार्यक्रमाच्या अंतर्गत शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांच्यावतीने क्रीडारत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
या पुरस्कार प्राप्ती बद्दल तालुक्यातील विविध स्तरातील व कागलच्या विविध संघटनांतील जेष्ठ मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.