मुरगूडमध्ये सत्तारूढ गटाचे प्रविणसिंह पाटील यांचे जल्लोशी स्वागत
मुरगूड ( शशी दरेकर ) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने २५ पैकी २५ जागा जिंकत विरोधी आघाडीचा धुव्वा उडविला. खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, ए. वाय. पाटील, समरजीत घाटगे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी परिवर्तन आघाडीचा या निवडणूकीत पूर्णत: सुफडासाफ झाला.
या निवडणुकीसाठी सत्ताधारी आघाडीच्या विरोधात परिवर्तनने तगडे आव्हान उभे केले होते. एकूणच निवडणूक प्रचारात परिवर्तनने जोरदार हवा निर्माण केली होती. परंतु त्यांना हा उत्साह मतदानापर्यंत पोहोचवता आला नाही. विरोधी आघाडीच्या एकाही उमेदवाराला विजय प्राप्त करता आला नाही.
मुरगूड मध्ये जल्लोश
विजयानंतर सत्तारूढ गटाचे प्रमुख उमेदवार प्रविणसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत प्रचंड जल्लोष करत डॉल्बी व हालगीकैइत्याळ आशा वाद्यांच्या माध्यमातून नाका नंबर एक पासून एसटी स्टँड ते तुकाराम चौक मार्गे अंबाबाई मंदिर येथे जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन मिरवणूक काढण्यात आली .मुरगूड परिसरातील आलले कार्यकर्ते यांनी गावोगावी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली .
यावेळी प्रविणसिंह पाटील म्हणाले की गेले 40 वर्षे मी या कारखान्यात संचालक म्हणून निवडून जातो शेतकऱ्यांचा व सभासदांचा कधीही मी अपमान केला नाही . पद असो वा नसो मी नेहमीच जमिनीवर असतो .म्हणूनच त्या कार्याच्या जोरावरच मला तीन नंबर चे मताधिक्य मिळाले याचा मला सार्थ अभिमान आहे .
प्रविणसिंह पाटील पुढे म्हणाले श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व आमचे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजयबाबा घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई जिल्हा शिवसेना अध्यक्ष विजय देवणे यां सर्वांनच्या नेतृत्वाखाली हे घवघीत यश मिळाल्या बद्दल त्याचे मी सर्व उमेदवार यांच्या वतीने आभार मानतो.
यावेळी वसंतराव शिंदे ,शिवाजीराव पाटील ,सत्यजित पाटील ,विकास पाटील, रणजीत सूर्यवंशी ,ऍड सुधीर सावर्डेकर, राजेद्र चव्हाण, जगन्नाथ पुजारी, संजय मोरबाळे, नामदेव भांदिगरे, अमर देवळे, रणजित मुगदुम, राहुल वंडकर, एम बी मेंडके, राजू आमते, बळीराम डेळेकर, विश्वास चौगले, राजू सोरप, प्रल्हाद कांबळे ,विजय शेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार दिग्विजयसिंह पाटील यांनी मानले.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?