कागल/प्रतिनिधी : अतिवृष्टीचा फटका बसल्याने कागल तालुक्यात नऊ घरांची पडझड होऊन दोन लाख 17 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तलाठी यांनी पंचनामे करून कागल तहसीलदार कार्यालयाकडे अहवाल सादर केले आहेत.
नुकसान झाल्याची नावे अशी, अनुक्रमे मुंगळी तालुका कागल येथील सागर काकासो कांबळे यांच्या घराची पडझड झाली आहे. अंदाजे नुकसान रुपये पन्नास हजार इतके झाले आहे. व्हन्नुर तालुका कागल येथील आत्माराम दगडू खाडे यांच्या घराची भिंत अंशतः पडली आहे त्याचे नुकसान रुपये पन्नास हजार इतके झाले आहे.


आणूर तालुका कागल येथील हिंदुराव लक्ष्मण आरडे यांच्या गोट्याचे पडझड झाली आहे. त्यांचे रुपये 50 हजार नुकसान झाले आहे. कापशी पैकी कोल्हेवाडी येथील शिवाजी विठ्ठल सावंत यांच्या घराची पडझड होऊन रुपये तीस हजार चे नुकसान झाले आहे. कापशी पैकी कोल्हेवाडी येथील भीमाशंकर नवाळे यांच्या घराची भिंत पडून रुपये तीस हजार चे नुकसान झाले आहे .सोनगे येथील निवास चंद्रकांत शिंदे यांच्या घराची भिंत कोसळून रुपये 7000 नुकसान झाले आहे असे सुमारे दोन लाख 17 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कागल येथील कमल बाळासो पाटील यांच्या सर्वे नंबर 115 मध्ये 50 गुंठे शेतीत उडीद पीक उन्हाळी लागण केली होती. त्याचे पूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. हे पीक पुन्हा उगवून आले आहे. त्याचाही पंचनामा तलाठी यानी केला आहे. तसेच कागल तालुक्यातील अवचित वाडी येथील शेतकरी संभाजी गायकवाड यांच्या केळीच्या बागेचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे.