सिध्दनेर्ली- नदीकिनारा येथे पुलावर पाणी
कागल/प्रतिनिधी : सिध्दनेर्ली- नदीकिनारा येथे पाणी आल्याने कागल – मुरगुड वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच एकोंडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
गेली आठवडाभर झाले पावसाने चांगलेच बस्तान बसविले आहे. त्यामुळे नद्यांना नाल्यांना पाणीच पाणी आले आहे. कागल ऊन मुरगूड कडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धनेर्ली नदी किनारा येथे दूध गंगा नदी वाहते या नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे व कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, ग्रामसेवक अजित जगताप तलाठी अमित लाटे,सरपंच दत्तात्रय पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर बॅरिकेट्स लावून वाहनांना बंदी घातली आहे.
कागल मुरगुड रस्ता बंद झाल्याने कागल, करनूर, वंदूर, शेंडूर मार्गे निढोरीकडे जाण्यासाठी पर्याय मार्ग चालू ठेवला आहे. तसेच एकोंडी येथील रस्त्यावर पाणी आल्याने कळम्मावाडी वसाहत मार्गे वाहतूक चालू ठेवली आहे.
you are in reality a just right webmaster The site loading velocity is incredible It seems that you are doing any unique trick In addition The contents are masterwork you have performed a wonderful task on this topic
What i dont understood is in reality how youre now not really a lot more smartlyfavored than you might be now Youre very intelligent You understand therefore significantly in terms of this topic produced me personally believe it from a lot of numerous angles Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga Your own stuffs outstanding Always care for it up