कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: मतदार यादीतील हरकतीसाठी मुदतवाढ

हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर २०२५

कागल : कागल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादीचा कार्यक्रम-२०२५ जाहीर केला आहे.

Advertisements

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी: प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी दिनांक ०८/१०/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisements

हरकती व सूचना दाखल करण्याची मुदतवाढ: प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम दिनांक १३/१०/२०२५ होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने (क्र. रानिआ/नप-२०२५/प्र.क्र.०९/का-६ दिः १३/१०/२०२५ अन्वये) या कालावधीस दिनांक १७/१०/२०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Advertisements

नगरपरिषदेचे आवाहन: नगरपरिषदेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीतील आपले नाव तपासावे. आवश्यक दुरुस्त्यांसाठी अर्ज दाखल करावेत.
मतदार यादी तपासणी: मतदार यादी तपासण्यासाठी ‘https://mahasecvoterlist.in/’ या संकेतस्थळावर तसेच संबंधित वॉर्डाची प्रारूप (Draft) मतदार यादी नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहे.

मतदार यादीतील त्रुटी आणि उपाययोजना:

नाव गहाळ असल्यास: ज्या मतदारांची नावे ०१/०७/२०२५ रोजीच्या विधानसभा भाग यादीत समाविष्ट आहेत पण कोणत्याच प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नाहीत, त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट असल्यास: हरकती व सूचना विचारात घेऊन अर्जाची शहानिशा करून आवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यात येईल.

दुबार नावे:

एकापेक्षा जास्त प्रभागात दुबार नावे आढळल्यास, अशा मतदारांची यादी सूचना फलकावर/वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.
मतदारांना ते कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत, याबाबत लेखी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कळवल्यानुसार अंतिम यादीत नोंद होईल.

जर प्रतिसाद न दिल्यास, यादीतील त्यांच्या नावापुढे “दुबार नांव” अशी नोंद केली जाईल. अशा मतदारांची ओळखपत्रावरून खातरजमा झाल्यानंतरच त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली जाईल.

मृत व्यक्तींची नावे: अशा सर्व मतदारांची नावे असलेली ‘मार्क कॉपी’ तयार केली जाईल आणि BLO मार्फत पुढील कार्यवाही केली जाईल.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!