कागल : स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, कागल नगरपरिषदेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत आज, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ५२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अजय पाटणकर यांनी शासकीय प्रेस नोटद्वारे ही माहिती दिली.

निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज सादर करण्यासाठी निश्चित केलेल्या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र त्वरित सादर करावे, असे आवाहन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केले आहे.
या संदर्भातील पुढील माहिती व कार्यवाही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अर्ज दाखल करण्याची स्थिती (दिनांक १४ नोव्हेंबर २०२५, दु. ३.०० वाजेपर्यंत):
नगराध्यक्ष पद: १
नगरसेवक पद: ५२
इच्छुक उमेदवारांनी निर्धारित वेळेत अर्ज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.