कागल: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रशासकीय निकषांवर न उतरल्यामुळे जिल्हा परिषदेचा १ आणि पंचायत समितीचे १० असे एकूण ११ अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
Advertisements

जिल्हा परिषदेसाठी म्हाकवे गटातून अश्विनी कांबळे यांचा अर्ज बाद झाला असून आता ६७ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समितीसाठी विविध गणांतून १० अर्ज बाद झाल्याने १३९ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. कसबा सांगाव गटातील मौजे सांगाव गणातून सर्वाधिक २ अर्ज बाद झाले आहेत. २७ जानेवारीपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
Advertisements

AD1