कागल बसस्थानक दुरूस्तीसाठी बंद; प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

कोल्हापूर विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कागल

कागल : कोल्हापूर विभागाच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) कागल बस स्थानकातील प्रवाशांना एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असल्याने दि. ०६/१२/२०२५ पासून हे बस स्थानक पुढील सूचना मिळेपर्यंत (काम पूर्ण होईपर्यंत) बंद ठेवण्यात येणार आहे.

Advertisements

या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने वाहतुकीसाठी खालील पर्यायी ठिकाणांची व्यवस्था केली आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Advertisements

पर्यायी बस स्थानक ठिकाणे

कागल बस स्थानक बंद असताना, विविध मार्गांवर धावणाऱ्या बसेससाठी खालील ठिकाणे तात्पुरती बस स्थानके म्हणून वापरली जातील:

Advertisements
क्र.बसेसचा मार्गपर्यायी थांबा
१.रंकाळा-कोल्हापूर-पुणे कडे जाणाऱ्या बसेसहायवे पलीकडे सगुणा चिकन दुकानासमोर.
२.निपाणी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, सावंतवाडी, बुरगुड, आणि बाचणी कडे जाणाऱ्या बसेसजुना बस स्थानकाबाहेर.
३.हुपरी-इचलकरंजी-जयसिंगपूर कडे जाणाऱ्या बसेसभुयेकर पेट्रोलपंपासमोर.

कागल बस स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी या पर्यायी व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.


AD1

Leave a Comment

error: Content is protected !!