आमदार हसन मुश्रीफ यांच्या मंत्रीपदाने कागल मध्ये जल्लोष

कागल (प्रतिनिधी) : कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे नवव्यांदा मंत्री झाले. त्यांनी नागपूर येथे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली अन् कागलमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आनंदोत्सव साजरा केला.

Advertisements

       महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर कागल मतदारसंघातील कार्यकर्ते सकाळपासूनच चार्ज झाले होते. शपथविधी सोहळा मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी मुश्रीफ  प्रेमी कार्यकर्त्यांनी येथील गैबी चौकात मोठे स्क्रीन लावली होती. कार्यकर्त्यांनी तसेच आबालवृद्ध व महिलांनी हा सोहळा प्रत्यक्ष लाईव्ह पाहिला.

Advertisements

        राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मंत्री मुश्रीफ यांच्या नावाचा जयघोष केला. जयघोषाने कार्यकर्त्यांनी गैबी चौक परिसर दणाणून सोडला. आनंद उत्सव साजरा केला.

Advertisements

     आमदार हसन मुश्रीफ हे 1999 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला .जुलै 2004 मध्ये शालेय शिक्षण, पशुसंवर्धन दूग्धविकास औकाफ खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.10 डिसेंबर 2008 पासून नगरविकास जमीन कमाल धारणा, दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय, अल्पसंख्यांक, विकास निधी व न्याय खात्याचा कार्यभार सांभाळला.

      22 ऑक्टोबर 2009 मध्ये विधानसभेवर असं मुस्लिम हे तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून कामगार जलसंपदा खात्याचा कार्यभार सांभाळला. 2014 ला हसन मुश्रीफ हे चौथ्यांदा आमदार झाले. 2019 मध्ये ते पाचव्या आमदार झाले 23 नोव्हेंबर 2024 ला त्यांनी षटकार मारला ते सहाव्यांदा आमदार झाले .आज त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

      कागल गडहिंग्लज उत्तर विधानसभा मतदारसंघात सात हजार कोटी रुपयांची विकास गंगा साकारणारा आमदार म्हणून हसन मुश्रीफ यांचा नावलौकिक आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!