मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मध्ये निश्चितपणे पत्रकार भवन साकारणार आहे त्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न व पाठपुरावा राहील असे उद्गार माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी येथे काढले. मुरगूडच्या राणाप्रताप क्रीडा मंडळाच्या दुर्गादेवीच्या दैनिक आरतीच्या वेळी ते बोलत होते.या वेळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. जेष्ठ माता भगिनींनीचाही सत्कार मंडळाने खासदारांचे हस्ते केला.भगिनींनी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना शुभाशीर्वाद दिले.
पत्रकारांच्या वतीने सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार वि.रा. भोसले यांनी पवित्र वातावरणात पत्रकारांचा सत्कार होतोय असे सांगून प्रा. मंडलिक यांचे आभार मानले.माजी खासदार स्व.मंडलिक यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.त्यांची प्रेरणा आजही सर्वांच्या पाठीशी आहे असे नमूद केले.

यावेळी प्रमुख पाहुणे पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे. उपाध्यक्ष राजू चव्हाण, प्रविण सुर्यंवशी, महादेव कानकेकर, अनिल पाटील, दिलीप निकम, जोतिराम कुंभार, ओंकार पोतदार, विजय मोरबाळे, सर्जेराव भाट यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, सुखदेव येरुडकर, माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, नगरसेवक सुहास खराडे, एस. व्ही. चौगुले इत्यादींचा समावेश होता.