मुरगूड ( शशी दरेकर ) : सोनाळी ( ता. कागल ) येथील आनंदराव भाऊसो शेणवी यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तिजोरी फोडून त्यातील अडीच तोळ्याचे दागीने व रोकड असा तीन लाखाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला . या चोरीसंदर्भात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या चोरी संदर्भात अधिक माहिती अशी : सोनाळीमधील शेणवी वसाहतीमध्ये रहात असलेल्या आनंदराव भाऊसो शेणवी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरुम मधील तिजोरीचा दरवाजा उघडून त्यातील तिजोरीचे लॉकर मोडून त्यातील दीड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, अर्धा तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या तसेच चार हजारची रोकड असा तीन लाखाचा ऐवज अज्ञात चोरटयांनी लंपास केला. या चोरीची मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे. अधिक तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
I¦ll right away snatch your rss as I can not find your e-mail subscription link or newsletter service. Do you have any? Please permit me know in order that I may just subscribe. Thanks.