पेठ वडगाव (सुहास घोदे) : आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने स्थिरावलेल्या जयभवानी अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये ४१ वा वार्षिक सभासद सन्मेलन नुकतेच उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोख यांनी सांगितले की, पतसंस्थेच्या शाखांचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. संस्थेचा आर्थिक विकास आणि पारदर्शी व्यवहारामुळे सभासदांचा संस्थेवर विश्वास वाढत असून, ग्राहकांना अद्ययावत सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विनायक माळगुंडे, श्रीमती सौ. सुरूचिता पोख, श्री. सुरेश शिंदे, श्री. सुशांत माने, श्री. अमोल पोख, श्रीमती पूजा पोख, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध खात्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. कायदेशीर सल्लागार श्री. शरद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सभासदांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

कार्यक्रमाचे आयोजन व सुव्यवस्थापन श्री. गुलाबराव पोख यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यशाळेत संस्थेचे आगामी योजनांवर विशेष भर देण्यात आला असून, शाखांचा विस्तार आणि नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.