मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरीचे वाढते प्रमाण

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूडमध्ये मंगळवार बाजार दिवशी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. मुरगूडचा बाजार हा मोठया प्रमाणात भरला जातो. आसपासच्या खेडया- पाड्यातून बाजारात भाजीपाला, किराणा व इतर खरेदीसाठी पुरुष् व महिला येत असतात त्यामुळे बाजारामध्ये खूप गर्दी असते.

Advertisements

त्याचा फायदा घेऊन मोबाईल चोर मोबाईलची चोरी करतात. गेल्या बाजारा दिवशी आठ ते दहा नागरीकांचे वरच्या खिशामधील मोबाईल हँडशेट चोरीस गेले. या वाढत्या मोबाईल चोरीस आळा बसावा यासाठी पोलीसानीं करडी नजर ठेवून मोबाईल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!
International Yoga Day 2025