नेर्ली-विकासवाडीत परिसरात वारंवार चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): नेर्ली-विकासवाडी परिसरात चोऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पाच ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विकासवाडी येथील श्री साई कोच बॉडी बिल्डर चे मालक जगदीश मोहनराव यांच्या लक्झरी बसमधील दोन नवीन बॅटरी, एक जुनी बॅटरी, एक गॅस सिलिंडर आणि गाईच्या चाऱ्यासाठी ठेवलेली दानपेटीमधील १५,००० रुपये असा एकूण ६५,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

Advertisements

तसेच कोंडेकर सिमेंट काँक्रीट जवळ बाळासो कल्लाप्पा चौगुले यांच्या कामाच्या साईटवरील वेल्डिंग मशीन, ग्राइंडर आणि अन्य साहित्य चोरीला गेले आहे. अंदाजे ३५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्राफण इंडस्ट्रीज नेर्ली येथील  लेथ मशीनच्या ३ एचपी क्षमतेच्या चार मोटर आणि १ एचपी क्षमतेची ग्राइंडर मोटर, एकूण ५०,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. काही शेतक-यांच्या सबमर्सिबल मोटरी चोरीला गेल्या असून, यामुळे शेतीची कामे खुळबंली आहेत. यासह इतरही अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपात चोऱ्या झाल्या असून सदरच्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराटीची वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Advertisements

नेर्ली-विकासवाडी, गोकुळ शिरगाव परिसरात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान-मोठ्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली असून, याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद झालेली नाही. चोरीच्या घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत आणि परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकातून करण्यात आली आहे.

Advertisements
AD1

1 thought on “नेर्ली-विकासवाडीत परिसरात वारंवार चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण!”

Leave a Comment

error: Content is protected !!