मुरगूडमध्ये कौटुंबीक वादातून शिक्षक पती कडून  पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून खून !

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील एका शिक्षकाने कौटुंबिक वादातून आपल्या शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली . घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे.

Advertisements

             अधिक माहिती अशीः येथील  साई कॉलनीत रहात असलेल्या शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३ ) याचे आपली पत्नी  सौ सविता लोकरे (वय ४५)  हिच्याशी कौटुबिक कारणातून वारंवार भांडण होत होते आज त्याचे पर्यावसान खूनात झाले  या दोघात  वाद सुरु झाला . यावेळी त्यांच्या मुलांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण शेवटी वाद विकोपाला  गेला . शिक्षक पतीने  राग अनावर झाल्याने वरवंटा घेवून  पत्नी सौ सविताच्या डोक्यात घातला यात त्या गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्या. ही घटना सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. या प्रकरणाने खळबळ उडाली.
 

Advertisements

        या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  मुरगूड ग्रामीण रुग्णालयात हलविला . अप्पर  जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनीही  दुपारी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती घेतली . अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत

                दरम्यान यासंबंधी अपूर्वा परशराम लोकरे (वय २५ ) हिने आपल्या आईच्या या दुदैवी घटनेसंबंधी  मुरगूड पोलीसात फिर्याद दिली असून घटनेची नोंद झाली आहे . शिक्षक पती परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!