मेतकेत भाविकांची चारचाकीची काच फोडून २९.७३ लाख किंमतीचे ४० तोळे सोन्याचे दागिने लंपास

मुरगूड ( शशी दरेकर ) : मेतके (ता.कागल) येथे बाळू मामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची क्रेटा चारचाकी  (नं MH १४ KN ८८१०) गाडीची पाठीमागील काच फोडून अज्ञात चोरटयाने २९, २३, ५०० रु किंमतीच्या ४० तोळे सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची तसेच ५०,००० रोख रक्कम असलेली पर्स असे २९, ७३, ५०० किंमतीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली आहे . ही घटना १३ फेबुवारी रोजी ६.३० ते ७.०० च्या दरम्यान घडली असून मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे .

Advertisements

             मुरगूड पोलिस व घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मूळ देवगड येथील पण सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले वेदांत विजयकुमार धुमाळ, त्यांची आई,विवाहित बहीण व तिचा पती व आणखी एक बहीण असे पाच जण मेतके येथे दर्शनासाठी आले होते.सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांनी अगोदर मूळ मंदिरात दर्शन घेतले व नंतर ते गलगले रस्त्याला असलेल्या बाळूमामा- सत्यवादेवी जोड मंदिरात दर्शनासाठी गेले.

Advertisements

यावेळी गाडी मंदिराच्या नजीकच रस्त्याकडेला पार्क करून हे सर्व मंदिरात गेले होते.तिथे दर्शन घेऊन बाहेर गाडीजवळ (एम.एच. १४ के.एन.८८१०)  येताच  पाठीमागील काच फोडून आत ठेवलेली दागिन्यांची बॅग पळवल्याचे लक्षात आले.या भाविकांमधील धनकवडी(पुणे) येथील अक्षय निखिल बेंद्रे यांचा ३ फेब्रुवारी रोजी विवाह झाला आहे.त्यामुळे पत्नीसह ते दर्शनास आले होते व सध्या जयभवानी कॉलनी कसबेकर पार्क

फुलेवाडी (ता – करवीर ) येथे तापूरत्या घेतलेल्या घरात राहात होते . तिथे कोणी परिचित नसल्याने घर बंद करून येताना सर्व दागिने बॅग मधून सोबतच आणल्याचे धुमाळ व बेंद्रे यांनी सांगितले .

Advertisements

             या चोरीत ४० तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यात बांगड्या, मंगळसुत्र ,हार ,छोटे मंगळसूत्र , रिंगा ,झुमका ,नथ ,लहान हार ,ब्रेसलेट, अंगठ्या , पिळाची अंगठी ,चेन व चांदीचे ब्रेसलेट चेन,अंगठी, पैंजण व कडे असा ऐवज व रोख ५० हजार रु . लंपास झाले आहेत . याबाबतची फिर्याद वृषाली विजयकुमार धुमाळ यांनी मुरगूड पोलिसात दिली असून मुरगूड पोलिस अधिक तपास  करीत आहेत .

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!