अपघातात हुपरी चांदी व्यवसायिकाचा मृत्यू

हुपरी (सलीम शेख) – हुपरी येथील कागल एमआयडीसी रोडला असणाऱ्या व्यंकटेश सहकारी सूतगिरणीच्या जवळुन लग्न समारंभ आवरून येत असताना MH-09-BC-2169 अॅक्सिस गाडी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक झाली. 

Advertisements

व मागून आलेल्या हौदा टेम्पो MH-09-CU- 2854 याचे दोन्ही चाके अंगावरून गेल्याने हुपरीचे सुनील पुरंदर गाट, वय ५० (हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष)यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisements

अपघातग्रस्त सुनील गाट यांना हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता त्या ठिकाणी पोस्टमार्टम विभाग बंद असल्याने त्यांना इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले. सुनील यांच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Advertisements

सुनील गाट हे चांदी व्यवसायाबरोबरच स्टेशनरी व्यावसायीक होते. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचे ते पुतणे होते तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष होते.

सुनील गाट हे हुपरी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात आलेल्या रजत नावारूपाला एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!