मुरगूड येथे ”होमगार्ड वर्धापन दिन ” वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम कार्यक्रम उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र गृह रक्षक दल अंतर्गत होमगार्ड व नागरी संरक्षण दिन यांच्या ७६ वा वर्धापन दिनानिमित्त मुरगूड पोलिस ठाणे अंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता मोहिम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वृक्षारोपण मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे.राहूल वाघमारे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

Advertisements

या वेळी होमगार्ड कडून पोलीस ठाणे परिसारात विविध जातीची झाडे लावण्यात आली. तर मुरगूड बाजार पेठेमध्ये स्वच्छता मोहिम करण्यात आली.या वेळी शहरातून होमगार्ड पथकाडून संचलन झाले.या वेळी मुरगूड होमगार्ड पथकाचे प्रभारी समादेशक अधिकारी जे. के.भोसले.लेखनिक राहूल जाधव.कुमार तांबेकर.के.डी.आंगज.राहूल गायकवाड.बाजीराव भारमल, भैरू नाईक, लक्ष्मण करगार.रोहित सुतार, विष्णू कुणकेकर, सोपान पाटील उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!