पिंपळगाव अंगणवाडी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात संपन्न

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील): पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथे अंगणवाडी मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisements

यावेळी प्रकल्प अधिकारी सौ. जयश्री नाईक, सुपरवायझर सौ सुमित्रा कोरवी, पिंपळगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ शीतल नवाळे या प्रमुख पाहुणे उपस्थित होत्या पाहुण्यांचे स्वागत यावेळी अंगणवाडी सेविका यांनी केले.

Advertisements

यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्यानी विविध गाणी नृत्य व इतर उपक्रम सादर केले कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका सौ अंजना आकुर्डे, सौ संगीता पवार, सुजाता मोरे, गीतांजली पाटील, कल्पना अकुर्डे, सुप्रिया मगदूम, रंगूताई गुरव, शमशाद शेख, अर्चना घाटगे, सुवर्णा दाभाडे यांनी केले होते याप्रसंगी पालक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!