मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडच्या ” लिटल मास्टर गुरुकुलम ” या शैक्षणिक संस्थेत आध्यात्मिक ज्ञानाबरोबर विज्ञानाचेही धडे दिले जातात त्याचबरोबर विद्यार्थ्याचा सर्वांगीन विकास केला जातो . तसेच येथे संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी गुरुकुलम कटीबद्ध आहे. पालकानीं मुलासाठी त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करु नये असे प्रतिपादन मुरगूड पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक कुमार ढेरे यानीं व्यक्त केले.
मुरगूड येथिल लिटल मास्टर गुरुकुलमच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
प्रारंभी पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे व मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रजलन करून स्नेहसंमेलनास सुरुवात झाली. सन २०२२-२३ मध्ये मुरगूड परिषदेतर्फे स्केटींग स्पेर्धेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार व कु. वृषाली कोंडेकर हीचा टी .सी.एस. कंपणीमध्ये एस .ई. म्हणून निवड झालेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गुरुकुलमचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष
अनावकर यानी प्रमुख पाहुणे मा. कुमारे ढेरे व मुरगूड नगरपरिषदेचे अधिक्षक मा. रमेश मुन्ने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे, पालकांचे व सर्व मुलांचे स्वागत सुभाष अनावकर यानी केले. गुरुकुलमच्या व्यवस्थापिका, संचालिका यानी आपल्या प्रास्ताविकात वार्षिक प्रगतीचा धावता आढावा घेतला. व पालकानां मौल्यवान अशा सूचना केल्या.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही समृध्दी व एन .एस.ई. या दोन्ही स्पर्धा परिक्षेत आपल्या गुरुकुलमचे विद्यार्थी जिल्ह्यात व राज्यात चमकतात .स्केटींग स्पर्धेतही आपले विद्यार्थी जिल्हापातळी, गावपातळीवर चमकतात . याचा सार्थ अभिमान आहे . शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांचा सर्वांगिण विकास करुन घेतल्याने गुरुकुलमचे नावलौकीक मुरगूड व मुरगूड प्रंचक्रोशित वाढत आहे.
पहिली ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्यांचा कलागुणदर्शन कार्यक्रम प्रश्नमंजुशा, अगोबाई , ओ-किस्ना है ,बम बम भोले , जुबी -जुबी, चक दे इंडीया , माय मराठी , जुई दरेकर व विहान मिरजकर ,यांचा नृत्याविष्कार व सौ . सुमन अनावकर यानीं बसवलेला-स्केटींग डान्स , कथक नृत्याने सर्वांना अचंबित करून सोडले.
मोक्षदा पोतदार हिने ” छोटेसे बहीन भाऊ हे स्वःता गाणे म्हणत कॅसिओ वादन करून प्रेक्षकांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळवली. असे हे ४५ घटकांचे कलागुण सादरीकरण व हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत व दिर्घकाळ चाललेला हा सांस्कृतिक , विविध कलागुणदर्शनाचा स्नेहसंमेलन कार्यक्रम श्रोते मनमुराद आनंद घेऊनच घरी परतले.
या स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरिता रणवरे , वर्षा पाटील, ज्योती डवरी , सिंधूताई कोंडेकर , संचली साळोखे, अंजली आमले , धनश्री कांबळे , अर्पणा माने,रश्मी सावंत, सुरेश सुतार , अश्विनी शिंदे या शिक्षकानीं अथक परिश्रम घेतले. शेवटी अमाप उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. अश्विनी शिंदे , सौ . वर्षा पाटील , सौ . रश्मी सावंत यानीं तर आभार सुभाष अनावकर यानीं मानले .