मुरगूड येथील जेष्ठ नागरीक संघात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथील मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात संपन्न झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर होते.

Advertisements

प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष पी .डी मगदूम यानी सर्वानां गुरुपौणिमेच्या शुभेच्छा देऊन , उपस्थितांचे स्वागत केले. सत्कारमूर्तीच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यानी आपलया प्रास्ताविकात गुरूपौर्णिमेचे महत्व सांगून मानवी जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्व असलेचे स्पष्ट करत संघाच्या कार्याची संक्षिप्त माहिती दिली.

Advertisements

यावेळी संघाच्या वतीने निवृत्त गुरुजन जी. के. भोसले, ज्ञानदेव देसाई, नंदकिशोर स्मार्त, संभाजीराव आंगज, मधुकर मंडलिक, श्रीमती सुषमा पाटील, पांडूरंग गायकवाड, मकरंद कोळी या सत्कारमूर्तीचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .

Advertisements

यावेळी जी .के. भोसले, पांडूरंग गायकवाड , ज्ञानदेव देसाई , नंदकिशोर स्मार्त, श्रीमती सुषमा पाटील यानी मनोगत व्यक्त केली. गुरूविना सदगती नाही, गुरु हे परमेश्वर आहेत, कल्पतरू आहेत , गुरु हे ज्ञानाचा अखंडपणे वाहणारा झरा आहे , गुरु म्हणजे निस्सीम भक्ती व श्रध्दा आहे , माता -पित्यानंतर गुरुला महत्व असल्याचे सांगत आपल्या भावनां व्यक्त केल्या. यानंतर संघाच्या सदस्यांचा व गुरुजनांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सत्कारमूर्ती श्रीमती सुषमा पाटील, नंदकिशोर स्मार्त, मकरंद कोळी यानी देणगी रुपाने संघास आर्थिक हातभार लावला. या कार्यक्रमास शिवाजी सातवेकर, अशोक डवरी, महादेव वागवेकर, सदाशिव एकल, सिकंदर जमादार, गणपती सिरसेकर, सुरेश दरेकर, रणजीतसिंह सासने, सौ .विद्यागौरी हावळ, तुकाराम भारमल, प्रा. चंद्रकांत जाधव, तानाजी डवरी, किशोर पाटील, अशोक पाटील, लक्ष्मण गोधडे, रामचंद्र पाटील, दादू बरकाळे, दादोबा मडिलगेकर, रामचंद्र रणवरे, लहु घोटणे, साताप्पा गोधडे, महादेव सुतार यांच्यासह नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संचालक जयवंत हावळ यानी केले तर आभार पी.आर. पाटील यानीं मानले .

Leave a Comment

error: Content is protected !!