मुंबई – नाट्य संस्थांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका भरण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली असून ३१ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत आहे. हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य अशा विविध गटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
Advertisements
सांस्कृतिक कार्य विभागाच्या https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. इच्छुकांनी वेळेत अर्ज भरून महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
Advertisements

राज्य नाट्य स्पर्धा 2025: महत्त्वाच्या तारखा आणि नियम
- प्रवेशिका सादर करण्याची मुदत: १ ते ३१ ऑगस्ट २०२५
- स्पर्धेची सुरुवात: ३ नोव्हेंबर २०२५ पासून
- स्पर्धेचे प्रकार: हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य.
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (https://mahanatyaspardha.com)
- मुख्य नियम:
- वेळेनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.
- अपूर्ण माहिती किंवा कागदपत्रांशिवाय अर्ज भरता येणार नाही.
- संस्थेची निवड झाल्यानंतर ठरलेल्या दिवशी प्रयोग सादर न केल्यास अनामत रक्कम जप्त केली जाईल.
- नियमांचे उल्लंघन केल्यास संस्था अपात्र ठरू शकते.
सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
AD1