कागल : मुंबई सर्वोदय मंडळाचे वतीने कळंबा जेल कोल्हापूर येथे गांधी शांती परिक्षेचे आयोजन केले होते. या परिक्षेसाठी शिक्षाबंधी 104 व न्यायाधिन बंदी 23 असे एकुन 127 कैदी बसले होते. ही परिक्षा तीन गटात घेतली होती प्रथम गटाने गांधी बापू, द्वितीय गटाने माझी जीवनकथा व तृतीय गटाने संक्षिप्त आत्मकथा या पुस्तकावर अभ्यास करून परिक्षा दिली होती. तीनही गटामध्ये प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक काढले होते.
तीनही गटातून एकूण दहा नंबर काडण्यात आले होते. त्या विजेत्या प्रत्येक परिक्षार्थीना प्रत्येकी खादीचा मोठा टॉवेल, रुमाल, निम साबन व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले.या उपक्रमात जेलमधील कैदी व अधिकारी यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कैद्यामध्ये पाश्चातापाची भावना निर्माण व्हावी. त्यांना सत्य व अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करता यावा व कारागृहातून बाहेर पडल्यावर एक जबाबदार नागरीक म्हणून जीवन व्यतीत करण्यास सक्षम बनवने हा या उपक्रमाचा उद्देश आहे.कैद्यांचे मनोबल वाढावे त्यांच्या मध्ये सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळावी यासाठी जेष्ठ गांधीवादी विचारवंत मा. एस. डी.पाटील सर यांच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते.
कैद्यासह 21 कर्मचारी व अधिका-यांनीही ही परिक्षा दिली. त्यातील ही प्रथम आलेल्या तीन परीक्षार्थींचा यथोचित सन्मान करण्या आला.या उपक्रमास उत्स्फूर्तपणे दाद दिल्या बद्दल मा. वरिष्ट तुरुंगाधिकारी एस. एन. कदम साहेब यांचा मंडळातर्फे शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मा. अधिक्षकसो पांडुरंग भुसारे साहेब, मा वरिष्ट तुरुंगाधिकारी एस. एन. कदम साहेब, मा. वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतीश कांबळे साहेब, तुरुंगाधिकारी प्रवीण औंदेकर साहेब, कारागृह शिक्षक बालाजी म्हेत्रे गुरुजी यांनी सहकार्य केले तर मुंबई सर्वोदय मंडळ व ग्रामविकास समिती कुरणी ता.कागल यांचे तर्फे भिमराव कांबळे व सचिन सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.