कागलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले होते आयोजन

कागल : वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

Advertisements

कागल शहरातील गोपाळकृष्ण गोखले भाग शाळा, जयसिंगराव पार्क येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. शिबिरामध्ये नेत्र तपासणी, दंत तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी आणि इतर अनेक प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

Advertisements

या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामदार मुश्रीफ यांनी या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले आणि नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Advertisements

या कार्यक्रमाला माजी आमदार बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, युवराज पाटील (बापू), चंद्रकांत गवळी, नविन मुश्रीफ, संजय चितारी, प्रकाश पाटील (बापू), पद्माकर भालेकर, सागर गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरामध्ये डॉ. संभाजी कोळी, डॉ. श्रीकांत देवणी, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. सिद्धेश पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. ज्ञानेश चौगुले, डॉ. दिनकर कदम, डॉ. आनंद कोळेकर, डॉ. संदीप ढोबळे, डॉ. अष्टदळ मकादार, डॉ. नाझीया पिंजारी, डॉ. लक्ष्मण कांबळे, डॉ. सद्दाम रंगरेज, डॉ. विजय ढोणे, डॉ. आनंद कवडे, डॉ. पिंटू कडवी, डॉ. पांडुरंग पोतले, डॉ. संतोष ढोणे, डॉ. प्रताप घाटगे, डॉ. दिलीप घाटगे, डॉ. गुरुदत्त डोर्लेकर, डॉ. विनय कांबळे, डॉ. अंजली कांबळे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. महावीर हावळगे, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. दिनेश पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ. ऋषिकेश नंदनवाळकर, डॉ. माधवी भोई, डॉ. वसीम तांबोळी, डॉ. मोहन कोळी, डॉ. सलमान काझी, डॉ. उमाजी पवार आणि डॉ. दावेद ढोबळे यांनी रुग्णांची तपासणी केली.

AD1

1 thought on “कागलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन”

  1. Definitely believe that that you stated. Your favorite reason seemed to be at the internet the easiest thing to bear in mind of. I say to you, I definitely get annoyed even as folks think about issues that they plainly do not understand about. You controlled to hit the nail upon the highest and defined out the whole thing with no need side effect , other people could take a signal. Will probably be back to get more. Thank you

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!