कागल : न्यू लाइफ फेलोशिप चर्च कागल व आशा धन्वंतरी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी(Eye examination) शिबिर घेण्यात आले सदर शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे साहेब यांच्या हस्ते झाले.
सदर शिबिरामध्ये डॉक्टर संदेश जंगले यांच्या सहकार्याने अनेक गरजूंची मोफत नेत्र तपासणी करून रुपये शंभर मध्ये चष्मा देण्यात आला सदर शिबिर चर्चेचे पास्टर विलास सुरवसे यांच्या मार्गदर्शनानुसार यशवंत किल्ला या ठिकाणी घेण्यात आले सदर शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला व अनेक गरजूंनी सदर शिबिराचा लाभ घेतला.
सदर शिबिरामध्ये माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे माजी नगरसेवक गणेश कांबळे शिवाजी सोसायटीचे माजी चेअरमन भगवान कांबळे निलेश कांबळे रोमांना सोनुले अभिषेक सुरवसे जयराज कांबळे रुपेश सोनुले आशिष सुरवसे डॉक्टर महापुरे रामदास पनदे संजय हेगडे अभिषेक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते