कोल्हापूर (सुरेश डोणे) : कोगील बुद्रुक (ता.करवीर) येथे श्री. स्वामी समर्थ मंदिराची पायाभरणी करण्यात आली.श्री.स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ कोगील बुद्रुक यांच्या वतीने गावामध्ये सुंदर श्री.स्वामी समर्थ मंदिर उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आज मंदिराचा पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी विष्णू चौगुले, विशाल पाटील, धनाजी बनकर,सचिन गुडाळे, रावसाहेब पाटील सर, बाळकृष्ण खोत सर, बाजीराव गणेशाचार्य, चंदर कांबळे, संदिप बच्चे,जयसिंग कोळेकर,ब शहाजी मोहिते, प्रेम घराळ,पांडुरंग ताकमारे,रघुनाथ बनकर, संदीप बच्चे, निवास गुडाळे, संभाजी परीट, निवास ताकमारे, तानाजी ताकमारे, सचिन पाटील, निलेश गुडाळे, अजित चौगुले, श्रीकांत गुडाळे, कृष्णात निश्चिते, मनोज चौगुले, सुरेश गणेशाचार्य, सदाशिव चौगुले,माजी पोलीस पाटील रामगोंड पाटील, इंदुबाई जाधव, गावातील तरुण मंडळे,महिला मंडळे,ग्रामस्थ व पंचक्रोशीतील श्री. स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लेकीने केली बापाची इच्छा पूर्ण……..
कोगील बुद्रुक (ता.करवीर) येथील कै. महादेव श्रीपती जाधव हे श्री.स्वामी समर्थांचे भक्त होते.आपल्या गावामध्ये श्री. स्वामी समर्थांचे भव्य मंदिर व्हावे अशी त्यांची फार मनोकामना होती. त्यांनी अनेक भाविक भक्तांना अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शनही घडवले होते. ते कोगील तसेच पंचक्रोशीत स्वामी भक्त म्हणून ओळखले जायचे.तसेच म्हादू आण्णा या नावानेही परिचित होते.पण त्यांचे एक वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आणि मंदिर बांधण्याचे त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले.पण,त्यांची कन्या तेजस्विनी जाधव हिने आपल्या बापाच्या इच्छेसाठी कंबर कसली.२ गुंठे जागा गावामध्ये घेऊन स्वामी समर्थांच्या मंदिराची पायाभरणी देखील केली. लेकीने आपल्या बापाची इच्छा पूर्ण केली. याबद्दल पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. व यासाठी कोगील बुद्रुक ग्रामस्थ, तरुण मंडळे व श्री. स्वामी समर्थ भक्त यांचे सहकार्य लाभले आहे. हे मंदिर लोकवर्गणीतून पूर्ण होणार असून ज्या भाविक भक्तांना सढळ हाताने मदत करायची आहे त्यांनी धनाजी बनकर- (89 75 90 24 41) व तेजस्विनी जाधव- (78 75 20 68 87) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट कोगील बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.