मुरगुड ( शशी दरेकर ) : येथील नगरपरिषदेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष शामराव शिवाजी घाटगे (वय ८७) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. लोकनेते सदाशिव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी दीर्घकाळ तसेच स्थानिक रयत विकास सेवा संस्थेचे सभापती म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.
मुरगुड नगरपरिषदेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे ते प्रमुख खंदे कार्यकर्ते होते. संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीचे जनरल मॅनेजर संजय घाटगे आणि सुरेश घाटगे यांचे ते वडील होत. पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि.२ रोजी सकाळी ९ वा. आहे.