व्हनाळी (वार्ताहर) : श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे ता.कागल येथे 77 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी अन्नपुर्णा कारखाना कार्यस्थळावर ध्वजाचे पुजन वीरपत्नी जयश्री जयवंत चौगले (बिद्री) यांच्या हस्ते व ध्वजारोहन चिमगाव ता.कागल येथील वीरपत्नी श्रीमती पुजा भगतसिंग एकल यांचे हस्ते झाले.
समृद्धी दुध शॅापी,अन्नपुर्णा पाणी पुरवठा, इंग्लीश स्कुल चे संयुक्तीक ध्वजारोहन कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआयच्या प्रांगणावर अजित चौगले (सांगाव) यांचे हस्ते दिपक चौगले, प्राचार्य आर. डी. लोहार, मुख्याध्यापिका सरिता घरमोडे यांच्या प्रमुख उपस्थीत झाले.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे , गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,सौ.अरूंधती घाटगे प्रमुख उपस्थीत होते. या ध्वजारोहन कार्यक्रमाच्या प्रारंभी इर्शाळवाडी येथील घडलेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमास चिफ केमिस्ट सुनिल कोकीतकर,चिफ अकौंटंट एस.एस. चौगले,पर्चेस मॅनेजर कृष्णात कदम, तसेच संचालक धनाजी गोधडे, एम.बी.पाटील, विश्वास दिंडोर्ले, मल्हारी पाटील, राजू भराडे, दिनकर पाटील, सुभाष करंजे, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, हंबीरराव पाटील, विष्णू पाटील, रजनी कांबळे, मारूती सांवत, सचिन गाडेकर, दत्ता पाटील, अमर एकल, विश्वास चौगले, आकाराम बचाटे, जयंत पाटील, तानाजी कांबळे आदी उपस्थीत होते. स्वागत सुभाष पाटील यांनी केले आभार सरिता पाटील यांनी मानले.