आता सोपे झाले ! परिवहन वाहनांच्या ‘Fitness Certificate’ नूतनीकरणासाठी कोल्हापूर RTO शी संपर्क साधा

कोल्हापूर : आपले परिवहन वाहन असेल आणि त्याचे योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) नूतनीकरणासाठी प्रलंबित असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! वेग नियंत्रकाच्या तांत्रिक अडचणीमुळे थांबलेली ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सर्व वाहनधारकांना तातडीने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Advertisements

परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नव्या आदेशानुसार, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अर्ज करताना वेग नियंत्रकाचा 16 अंकी UIN क्रमांक अपडेट असण्याची सक्तीची अट काढण्यात आली आहे. 2018 नंतरच्या वाहनांचे UIN क्रमांक उपलब्ध डेटावरून अद्ययावत केले जातील, तर 2018 पूर्वीच्या वाहनांवरील वेग नियंत्रक क्रमांक कार्यालयात तपासले जातील.

Advertisements

त्यामुळे, कोणताही विलंब न करता, आपल्या वाहनाचे काम पूर्ण करण्यासाठी आजच कोल्हापूर आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधा आणि कायदेशीर अडचणी टाळा!

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!