कागलमध्ये 6 ऑगस्टला फेरफार अदालत

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : प्रशासनामार्फत कागल तालुक्यामध्ये दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी सर्व मंडळ मुख्यालयी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.  फेरफार अदालतीमध्ये ज्या अर्जदार, खातेदारांनी खरेदी विक्रीनोंद, वारसनोंद, मृत्युपत्र नोंद, बोजा नोंद  इ. बाबत संबधित तलाठ्यांकडे फेरफार नोंदीसाठी अर्ज दाखल केले आहेत परंतु अद्याप त्यावरील कार्यवाही प्रलंबित असेल अशा सर्व अर्जांचा निपटारा यामध्ये करण्यात येणार आहे.

Advertisements

यासाठी नागरिकांनी दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत आपण केलेल्या अर्जाच्या मूळ प्रतीसह व आवश्यक मूळ कागदपत्रांसह  आपल्या संबंधित मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहुन या विशेष लोकाभिमुख उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांनी केले आहे.

Advertisements
AD1

4 thoughts on “कागलमध्ये 6 ऑगस्टला फेरफार अदालत”

  1. I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual info an individual supply in your visitors Is gonna be back regularly to check up on new posts

    Reply
  2. I was recommended this website by my cousin I am not sure whether this post is written by him as nobody else know such detailed about my trouble You are amazing Thanks

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!