शिरोली(सलीम शेख): शिरोली येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मयूर फाट्याजवळ गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक मालवाहतूक ट्रक महामार्गावरून अंदाजे 15-20 फूट खाली सेवा मार्गावर कोसळला.
सकाळी ११.३० च्या सुमारास उसाची भरलेली एक ट्रॉली शिरोली एमआयडीसीकडून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. या ट्रॉलीने अचानक ब्रेक मारल्याने मागे असलेली एक कारही थांबली. मात्र, यावेळी मागून येणारा एक मालवाहतूक ट्रक चालकाच्या नियंत्रणातून सुटला आणि समोरच्या वाहनांना टक्कर देण्याच्या भीतीने डाव्या बाजूला वळला. यामुळे ट्रक लोखंडी बॅरेकेट तोडून उड्डाणपुलावरून खाली कोसळला.यामुळे
या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
या अपघाताचे ट्रक चालकाचा वेळीच ब्रेक न लावणे असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
या भागत ऊस वाहतूक ट्रॉली, ट्रॉलीला रिफ्लेक्स लावणे आवश्यक आहे. तसेच ऊस वाहतूक ट्रॉली रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असतानाचे नियोजन लावणे गरजेचे आहे आणि अशा प्रकारच्या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
हे अपघात शहरासाठी एक मोठा धक्का आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हायवेचे काम सुरू असल्याने वाहतुकाच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यावर प्रशासनाने उपाय योजनात करणे गरजेचे आहे.