येस बँकेच्या ATM मध्ये ₹4500 च्या बनावट नोटा जमा; कागलमध्ये खळबळ

कागल (विक्रांत कोरे): येस बँकेच्या एटीएम मध्ये मशीनद्वारे रुपये 11500 भरणा करण्यात आला होता. यामध्ये रुपये पाचशेच्या नऊ नोटा बनावट निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना तारीख 15 मे रोजी येस बँक शाखा  रिंग रोड, सागर बेकरी जवळ कागल येथे घडली.

Advertisements

            मनोज कुमार पाच्छापुरे राहणार महावीर नगर हुपरी यांनी तारीख २५ मे रोजी कागल पोलीसात तक्रार दिली आहे. अज्ञात व्यक्तीने रिंग रोड कागल येथील सागर बेकरी जवळ असलेल्या येस बँकेच्या एटीएम मध्ये अज्ञात व्यक्तीने पाचशेच्या 23 नोटा रुपये अकरा हजार पाचशे जमा केले.

Advertisements

जमा केलेल्या 23 नोटांपैकी नऊ नोटा या बनावट असल्याचे निदर्शनास आल्याने पाच्छापुरे यानी कागल पोलिसात धाव घेतली आहे. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खैरमोडे हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!