
कागल (विक्रांत कोरे) : कागल येथील शाहू स्टेडियम येथे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) कार्यालय सुरू केले आहे. कार्यालयीन प्रवेश शुभारंभ 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी करण्यात आला.
या नूतन कार्यालयास कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अजय पाटणकर, कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र लोहार यांनी सदिच्छा भेट दिली.
गृहरक्षक दलाचे प्रभारी तालुका समादेशक अधिकारी कृष्णा पाटील व फलटणनायक दिलीप पसारे यांच्या हस्ते उपस्थित अतिथी मान्यवरांना बुके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन गृहरक्षक दलाचे जवान संजय घाटगे यांनी केले. लिपिक विश्वजीत वरक,कृष्णात गोंधळी, सचिन कांबळे ,सुरज कांबळे, अविनाश पाटील, शामराव पाटील आदींसह जवान उपस्थित होते. यावेळी गृहरक्षक दलाच्या जवानांनी संचलन केले.