कोल्हापूर ( सुरेश डोणे) : सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याच पद्धतीने विमल इंग्लिश स्कूल कोल्हापूर येथे “दहीहंडी” कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष घाटगे साहेब, संस्थेच्या सेक्रेटरी लीना कर्तस्कर,अश्विन कर्तस्कर व उपस्थितांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व पाळणा पूजन करून आरती करण्यात आली व दहीहंडी कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी टिपरी नृत्य तसेच विविध गीतांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिनी व शिक्षकांनी देखील दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. शेवटी मानाची दहीहंडी विद्यार्थ्यांनी चार ते पाच थर रचत फोडून “गोविंदा आला रे- आला”,बोल बजरंग बली की-जय” या गाण्यावरती सर्वांनीच ठेका धरला.यामुळे स्कूलचा सारा परिसर गोकुळमय झाला होता.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष घाटगे साहेब, संस्थेच्या सेक्रेटरी लीना कर्तस्कर,अश्विन कर्तस्कर,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विध्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.