मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने व दि मुरगूड इंजिनीयर्स अँड कॉन्ट्रेक्टर
असोसियशन यांचे सहकार्याने संघाच्या विरंगुळा केंद्रात ” अभियंता दिन ” मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन् झाला .
प्रारंभी संघाचे संचालक श्री. महादेव वाघवेकर यानीं सर्वांचे स्वागत केले.
भारतरत्न डॉ. विस्वेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन जेष्ठ अभियंत्याच्या हस्ते करणेत आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र सातवेकर हे होते.
संघाचे सदस्य प्राध्यापक चंद्रकांत जाधव यानीं डॉ. विश्वेश्वरांच्या जीवन कार्याची माहिती देऊन त्यानीं आभियांत्रिकी क्षेत्रात मोलाची कामगिरी केली असून देशभक्ती व सामाजिक बांधिलकेतून नव्याने विविध क्षेत्रात अनेक संस्था स्थापण केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात संघाच्या वतीने नूतन अध्यक्ष बाळासाहेब सुर्यवंशी अपाध्यक्ष मंदार सुर्यवंशी , सचिव ओंकार् खराडे , तसेच अभियंते पांडूरंग चौगले , विशाल रामशे, प्रविण दाभोळे , सागर भोसले , संतोष पाटील , आकाश आमते , आकाश दरेकर , मयूर आंगज, हर्षल आसवले , शुभम भोसले ,पुरशोत्तम देसाई , भय्या पाटील , शिकलगार यांच्यासह सर्व अभियंताचा गुलाबपुष्प देऊन व पेढा भरवून येथोचित सत्कार करण्यात आला.
या अभियंता दिनाच्या कार्यक्रमानिमित्य पी .जी. चौगले , विशाल रामशे , यानीं-मनोगत व्यक्त केले . या अभियंता दिनाचे औचित्य साधून निवृत अभियंता आनंदराव मोहिते यानीं व दि . मुरगुड इंजिनीयर्स अँन्ड कॉन्टक्टर्स असोसियशनच्या वतीने बाळासो सुर्यवंशी यानीं संघाचे कार्यासाठी देणगी रुपाने मदत केली . त्याबद्दल संघाचे वतीने त्यांचे आभार मानन्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र सातवेकर यानीं अध्यक्षीय भाषणात डॉ .विश्वेश्वर यांच्या केलेलया मौलिक कार्याचे कौतूक करून त्यांच्यासारखे प्रामाणिक व देशभक्त अभियंते होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमास संघाचे संचालक , सदस्य तसेच मुरगूमधील बहुसंख्य अभियंत्ये उपस्थित होते. शेवटी संघाचे अध्यक्ष श्री . गजानन गंगापूरे यानीं सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत हावळ यानीं केले.