
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतमध्ये रस्त्याकडेला वाढलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहिम गुरुवार दिनांक १३ सकाळी १० वाजता चार पोलीस अधिकारी, वीस पुरूष पोलीस, दहा महिला पोलीस, प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर उद्योग भवनाचे काही अधिकारी यांचा एवढा मोठा फौज फाटा घेऊन कडक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई एमआयडीसी फाटा , गोकुळ चौक, एसबीआय बँक पासून संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आली.नेहमी गजबजलेल्या एमआयडीसी फाटा ते बाबा राईसमिल चौका पर्यतची सर्व अतिक्रमणे काढून पूर्ण रस्ता खुला करण्यात आला. किरकोळ विरोधाचा प्रकार वगळता ही मोहिम शांततेत सुरु होती. यावेळी विनोद खोत, सागर खोत व काही खोकी धारकांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती मधील अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनाधिकृत केबीन्स, शेडस् हटाव मोहीम सुरु केली आहे. अवघ्या दोन तासातच दोन जेसीबी व तीन ट्रॉल्या घेऊन सर्व मोहीम तातडीने पार पाडण्याचे काम सुरू होते. ही मोहिम अधिक तीव्रतेने राबविली यावेळी सर्व कंपन्यांचे बोर्ड, दुकानांचे बोर्ड, काही औद्योगिक वसाहतीने दिलेले गाळया समोरील अतिक्रमण सुद्धा हटवण्यात आले. माळी कॉर्नर- वस्ताद चौक अनेक अनाधिकृत केबीन्स तसेच फलक व शेडस् हटविण्यात आली.
गोशीमा ऑफिसच्या अगदी जवळ खुलेआम अतिक्रमणे वाढू लागतात आणि सुस्त, निष्क्रिय यंत्रणेला याचा पत्ताच नसतो. याबाबत तक्रारीचा मारा सुरू झाल्यावर डोळे उघडलेल्या यंत्रणेकडून कारवाईची पावले कशी पडतात आज दिसून आले. अनधिकृत अंदाजे १२० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी काही लोकांनी बुधवारी रात्री आपल्या टपऱ्या व केबिन स्वतः काढून घेतलेले होत्या.

काही कंपन्यांच्या समोर झाडे लावण्यासाठी व बगीचेसाठी दिलेली जमीन मध्ये टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग केलेले आढळून आले. पण अशा कंपनीवर कारवाई का? केली नाही. अशी चर्चा सामान्य नागरिकांतून होत होती.दिव्याखाली अंधार प्रमाणे येथे अतिक्रमणे का? या अतिक्रमनाकडे डोळेझाक करण्यात आली. गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील अनाधिकृत टपऱ्या व केबिन यामुळे वाहतूक कोंडी, अपघात व अस्वच्छतेचे प्रश्न निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
Hey there just wanted to give you a quick heads up. The words in your article seem to be running off the screen in Internet explorer. I’m not sure if this is a format issue or something to do with browser compatibility but I thought I’d post to let you know. The layout look great though! Hope you get the problem fixed soon. Cheers
“Well explained, made the topic much easier to understand!”