कोल्हापूर : व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींसाठी एक सुवर्णसंधी! महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, कोल्हापूर यांच्या वतीने अनुदान, बीजभांडवल, थेट कर्ज आणि प्रशिक्षण अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत यांनी केले आहे.
Advertisements
सन २०२५-२६ या वर्षासाठी असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, महार, नवबौद्ध, हिंदु-खाटिक, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, मालाजंगम, बेडाजंगम या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी http://mahadisha.mpbcdc.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावेत.
Advertisements

योजनांचे फायदे थोडक्यात:
- अनुदान योजना: ५० हजार रुपयांपर्यंतच्या व्यवसायासाठी २५ हजार रुपये अनुदान आणि २५ हजार रुपये बँक कर्ज.
- बीजभांडवल योजना: ५० हजार १ ते ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसायासाठी महामंडळाकडून २०% बीजभांडवल (५० हजार अनुदानासह), बँकेकडून ७५% कर्ज आणि ५% लाभार्थी सहभाग.
अधिक माहिती आणि मदतीसाठी कोल्हापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कार्यालयाशी ०२३१-२६६३८५३ या क्रमांकावर संपर्क साधा.
AD1