मुंबई : राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील.
Advertisements
निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक
| टप्पा | तारीख |
| निवडणूक सूचना प्रसिद्ध करणे व अर्ज भरण्यास सुरुवात | १६ जानेवारी २०२६ |
| अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख | २१ जानेवारी २०२६ |
| अर्जांची छाननी (Scrutiny) | २२ जानेवारी २०२६ |
| अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत | २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत) |
| चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी | २७ जानेवारी २०२६ |
| मतदान (Voting) | ०५ फेब्रुवारी २०२६ |
| मतमोजणी (Result) | ०७ फेब्रुवारी २०२६ |
या १२ जिल्ह्यांमध्ये होणार निवडणूक
ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, अशा जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील जिल्ह्यांचा समावेश आहे:
Advertisements

- कोकण विभाग: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
- पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
- छत्रपती संभाजीनगर विभाग: छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर.
महत्त्वाचे मुद्दे:
- आचारसंहिता लागू: निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
- मतदान पद्धत: या निवडणुका EVM मशीनद्वारे घेतल्या जातील.
- मतदार यादी: १ जुलै २०२५ रोजीची अद्ययावत मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येईल.
- न्यायालयीन आदेश: सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र तांत्रिक कारणास्तव आयोगाला दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर हा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
AD1