मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकनेते दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशीर्वादाने मा.खासदार संजयदादा मंडलिक युवा नेते विरेंद्रभैया मंडलिक यांच्या सहकार्याने शिक्षकनेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोजिमाशि पतसंस्थेत झालेल्या संचालक मंडळ सभेत एकनाथ आरडे यांची तज्ञ संचालकपदी ही निवड करणेत आली.
एकनाथ आरडे हे क्रीडा विभाग प्रमुख म्हणून शिवराज विद्यालय जुनिअर कॉलेज मुरगूड येथे कार्यरत आहेत.इंग्रजी विषयाचे उत्तम अध्यापक म्हणून ते सर्वपरिचित असून मा. कागल तालुका क्रीडा समन्वयक म्हणून काम करत असताना कागल तालुक्याच्या शालेय क्रिडा प्रगतीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

गेली तीस वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यात मोलाचे योगदान त्यांनी दिले आहे. केंद्र शासन पुरस्कृत साई कुस्ती केंद्राच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
तालुक्यातील विविध शाळांना क्रीडा साहित्य, व्यायाम शाळा व क्रीडा सुविधा देण्यात सातत्याने ते प्रयत्नशील असतात. असे बहुआयामी शिक्षकनेतृत्व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित अशा एकनाथ आरडे यांची निवड करून शिक्षकनेते दादासाहेब लाड यांनी कागल तालुक्यातील तमाम शिक्षकांचा उचित गौरव केला आहे . अशी भावना निवडीनंतर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.