
कागल चे पहिले आमदार एम.आर.देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
मुरगूड ( शशी दरेकर ) : इंग्रजी शिक्षणामुळे चौकस आणि बुद्धीवादी बनलेल्या शिक्षण महर्षी एम.आर.देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यासारख्या ध्येयवादी बनलेल्या तरुणांनी सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी ग्रामीण भाग वाडा वस्त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात शैक्षणिक संस्था उभा केल्या.
शिक्षण महर्षी एम. आर. देसाई यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बहुजनांच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला,” असे प्रतिपादन मुरगुड विद्यालय ज्यूनिअर कॉलेजचे प्राचार्य एस.पी.पाटील यांनी केले.
ते मुरगुड विद्यालय ज्यूनिअर कॉलेज येथे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्राचार्य एम आर देसाई यांचा स्मृतिदिनी इंग्लिश दिवसानिमित्त विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रा. पी एस पाटील, समीर कटके,कु. पूजा पाटील कु. तेजस्विनी सावंत यांचे महर्षी एम. आर. देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विविध पैलूंना व्यक्त करणारी मनोगते झाली.स्वागत आणि प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख ए. एच. भोई यांनी केले.सूत्रसंचालन सौ बी. वाय. मुसाई यांनी केले.
यावेळी उपमुख्याध्यापक एस.बी.सूर्यवंशी एम.डी. खाटांगळे पर्यवेक्षक एस.डी.साठे,तंत्र विभाग प्रमुख पी.बी.लोकरे, ज्येष्ठ शिक्षक ए.एस. चंदनशिवे.वाय.ई.देशमुख,आर.जी. पाटील, श्रीकांत कुंभार, एस.एस.कळंत्रे, ए.एन.पाटील, ए. एम.कोळी, के.एस.पाटील, एस.जे. गावडे, व्ही.एस.सूर्यवंशी, कार्यालयीन प्रमुख महादेव कांबळे, प्रशांत डेळेकर टी.आर.शेळके, ए.एस.मांगोरे उपस्थित होते.

इंग्लिश डे निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेते अनुक्रमे…इयत्ता पाचवी हस्ताक्षर स्पर्धा सई अमोल रणवरे, आराध्या सुरज गवाणकर, सुजल सिद्राम पाटील,इयत्ता सहावी वर्ड बिल्डिंग कादंबरी विवेक वंडकर, शौर्या प्रवीण बरकाळे, सौरभ संदीप शारबिद्रे, ज्ञानेश्वरी बळीराम दरेकर,इयत्ता सातवी वर्ड चेन स्वरा अमोल गोरूले,ज्ञानेश्वरी कृष्णात भुते, पृथ्वीराज रणजीत कापसे,इयत्ता आठवी लैंग्वेज स्टडी ,प्राची अमर कांबळे, राई स्वप्नील शहा, मधुरा स्वप्निल गुरव,इयत्ता नववी ग्रामर सत्यजित समीर कटके,आर्यन अमित भोई,कार्तिक विलास अनुसे, इयत्ता अकरावी निबंध लेखन धनश्री बाळासो आंगज, पूजा साताप्पा आरागडे, अक्षरा शिवाजी गोल्हार .