मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे नवीन वाहनांचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील अल्पावधीत नावारूपाला आलेल्या मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत नवीन चार वाहनांचे वितरण करण्यात आले. वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री. जावेद धोंडीबा मकानदार यानीं दिली.

Advertisements

याप्रसंगी संस्थेच्या वतीने मोसिन चाऊस, राहुल कांबळे, शंकर गिरी यानां सी. एन. जी. रिक्षांचे वितरण त्याचबरोबर मनवेल फर्नांडीस यानां होंडा गाडीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तानाजी यशवंत सुर्यवंशी (उद्योजक ) हे होते.

Advertisements

यावेळी संस्थेचे आधारस्तंभ हाजी धोंडीबा मकानदार यानीं पाच महिन्याच्या अल्पकालावधीत संस्थेने पाच कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करून संस्था प्रगतीपथाकडे गरुडझेप घेत असल्याचे सांगितले.

Advertisements

यावेळी तानाजी सुर्यवंशी, शशिकांत दरेकर, राजू चव्हाण, ओंकार पोतदार, माजी नगसेवक दत्तात्रय मंडलिक, दिपक परीट व संस्थेचे सभापती जावेद मकानदार या मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले व वाहनधारक मालकांना वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

या वाहन वितरण प्रसंगी संस्थेचे सभापती जावेद मकानदार, उपसभापती मधुकर कुंभार, संचालक संजयकुमार रामसे(डॉक्टर), सचिन मिसाळ, सर्जेराव भांडवले, संजय पाटील, राजेश चेचर, सचिन जाधव , विनोद कांबळे, संचालिका सौ. कांचन खराडे, सौ. ज्योती शिंदे, मॅनेंजर अजितकुमार कापसे, यांच्यासह रसुल मुल्ला, रणजित कुंभार, रोहित चव्हाण, नामदेव शिंदे, हर्षद सुतार, कर्मचारी वर्ग, सभासद उपस्थित होते. स्वागत अजितकुमार कापशे यानी केले तर आभार अभिजीत मगदूम यानीं मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!