मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल स्व . खा . सदाशिवराव मंडलीक साहेब यांच्या आशिर्वादाने व मा. खासदार संजयदादा मंडलिक आणि युवा नेते अँड. विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी व सर्वदूर नावलौकीक मिळवलेली राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य संस्थेच्या सर्व सभासदानां ब्लँकेट भेट वस्तूच्या वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम शनिवार दि. २५/ १०/२०२५ रोजी मोठया उत्साही वातावरणात करण्यात आला.
सदर ब्लँकेट वाटप कार्यक्रम प्रसंगी नामदेवराव मेंडके, बाजीराव गोधडे, शिवाजीराव चौगले, जयसिंग भोसले, किरण गवाणकर, जे .के. भोसले, संभाजी आंगज, सर्जेराव पाटील, दत्तात्रय मंडलिक, सुनिल मंडलिक, दिपक परिट या मान्यवरांच्यासह संस्थेचे सभासद, महिला सभासद, चेअरमन, व्हा . चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कार्यलक्षी संचालक, सर्व शाखाधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
