मुरगूड ( शशी दरेकर ) : सध्या सहकारी पतसंस्थेनां अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत आहे. पतसंस्था टिकवण्यासाठी संचालक मंडळाने योग्य खबरदारी व पारदर्शक कारभार केला पाहिजे. सहकारी पतसंस्था टिकल्या तर सर्वसामान्य सभासदानां न्याय मिळेल.
तसेच कर्जदाराची पत पाहूनच कर्ज वितरण केले पाहिजे असे प्रतिपादन श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर यानीं केले. ते विजय ज्ञानदेव देवडकर रा. सोनगे याना नवीन वाहन “बलोरो पीकअप ” च्या पूजन व वितरण प्रसंगी बोलत होते.
बलोरो पीकअप गाडीचे पूजन करून श्री. विजय देवडकर यानां गाडीची चावी सुपूर्द करण्यात आली. या वाहन वितरण प्रसंगी श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, संचालक सर्वश्री प्रशांत शहा, शशी दरेकर, नामदेवराव पाटील, प्रदिप वेसणेकर, यशवंत परीट, महादेव तांबट, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, रणजीत मोरबाळे, अनिल मगदूम, यांच्यासह संस्थेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता .