कृषि पुरस्कार प्रस्तावासाठी ३० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनी, व्यक्तींनी आणि संस्थांनी तातडीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शेतकरी, व्यक्ती, गट,संस्था यांनी कृषि पुरस्कारासाठी परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते, पंरतु प्रस्ताव सादर करण्यास दिनांक ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती कृषि उपसंचालक नामदेव परीट व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालिंदर पांगरे यांनी परिपत्रकाव्दारे दिली आहे.

Advertisements

 कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, महिला यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. सन 2024 या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांनी वरीलप्रमाणे विविध कृषी पुरस्कारांसाठी परिपूर्ण प्रस्ताव आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दिनांक 30 ऑगस्ट 2025 पूर्वी सादर करावेत.

Advertisements

पुरस्काराचे नाव, पुरस्कार संख्या, पुरस्काराची रक्कम, पुरस्काराचे स्वरुप खालीलप्रमाणे आहे.

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार- राज्यातून फक्त एक- पुरस्काराची रक्कम 3 लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

Advertisements

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 2 लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

जिजामाता कृषीभूषण पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 2 लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 2 लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 1 लाख 20 हजार रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

युवा शेतकरी पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 1 लाख 20 हजार रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

उद्यानपंडित पुरस्कार- विभागातून एक- पुरस्काराची रक्कम 1 लाख रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण व आदिवासी गट) प्रति जिल्ह्यातून एक- पुरस्काराची रक्कम 44 हजार रुपये, पुरस्काराचे स्वरुप- रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार

विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यासाठी अधिक माहितीसाठी सहाय्यक कृषी सहाय्यक, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!