कसबा सांगावात भरदिवसा चोरी

कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील सुळकुड रोडवर घरफोडीचा प्रकार सकाळी साडेआठ ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडला. सोन्याचे किमती दागिने व  तांब्याचा हंडा असा एकूण २ लाख ५८ हजारांची चोरी करून अज्ञात चोरट्यानी पोबारा केला आहे. भर दिवसा झालेल्या घरफोडीने नागरिकातून भीतीचे सावटआहे. श्रुतिका किरण पाटील, राहणार कसबा सांगाव यांनी कागल पोलिसात तक्रार दिली आहे.

Advertisements

          पोलिसांच्या माहितीनुसार, श्रुतिका पाटील या प्रमोद सदाशिव माळी सुळकुड रोड, महावीर नगर ,चौगुले मळा ,कसबा सांगाव तालुका कागल येथे भाड्याने राहतात. त्या लॅब टेक्निशियन आहेत. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या व त्यांचे पती दोघेही आपापल्या कामावर निघून गेले .श्रुतिका या दोन वाजता जेवण करण्यासाठी घरी आल्या. यावेळी त्यांना गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले .पती किरण पाटील व ओळखीचे सागर माळी, श्रीकांत माळी यांना बोलावून घेतले .व घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व साहित्य विस्कटलेले होते .बेडरूम मधील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे किमती दागिने व किचन मधील तांब्याचा हंडा अज्ञात चोरट्यानी घरफोडी -चोरी करून पोबारा केल्याचे निदर्शनास आले.

Advertisements

        कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार, साहेब फौजदार प्रशांत माने, प्रभाकर पुजारी, युवराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Advertisements

         *चोरीस गेलेला माल*
*अडीच तोळे सोन्याचे गंठण रुपये २ लाख.
*तीन ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुमके रुपये २४ हजार.
*चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी रुपये ३० हजार.
*किचन मधील तांब्याचा हंडा रुपये ४ हजार
   असा एकूण  २ लाख५८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व तांब्याचा हंडा अज्ञात चोरट्यानी घेऊन पोबारा केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

             कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करीत आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!